जामनेर : प्रतिनिधी । शहरापासून जवळच १५ एकरातील प्रशस्त , आधुनिक रुग्णालय जामनेरात उभारण्याचा संकल्प आज माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांनी ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटलचे उदघाटन प्रसंगी बोलून दाखवला .
ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटलचे उदघाटन प्रसंगी यजमान म्हणून केलेल्या भाषणात आमदार गिरीश महाजन म्हणाले कि , हा कार्यक्रम राजकीय नाही . त्यांच्या या बोलण्याला एकनाथराव खडसे यांचं संभाव्य पक्षांतराच्या चर्चेचा संदर्भ होता . ते पुढे म्हणाले कि , राज्यातील मान्यवर दानशूर व्यक्ती , सामाजिक संस्था आणि तज्ज्ञ् डॉक्टरांच्या प्रयत्नांनी आणि सहकार्याने ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल उभे राहिले आहे . या तालुक्यातील रुग्णांना जामनेरातच आधुनिक उपचार देणारे रुग्णालय असावे म्हणून अशा रुग्णालयाचा विचार ७ वर्षांपासून करत होतो त्याला रामेश्वर नाईक यांच्या समर्पित सहकार्याने मूर्त रूप आज मिळाले . या रुग्नालयात अवयव प्रत्यारोपण सोडून सर्व आजारावरचे सर्व प्रकारचे उपचार आणि शस्त्रक्रिया माफक दरात केल्या जातील . सिटी स्कॅन , एम आर आय साठी आता मोठ्या शहरांमध्ये जावे लागणार नाही . अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे ४ ऑपरेशन थिएटर्स येथे आहेत येथे कॅमेऱ्यातून पाहून मुंबई , पुण्याचे निष्णात डॉक्टर्स ऑपरेशनसाठी येथील डॉक्टरांना मार्गदर्शन करू शकतील अशी सुविधा आहे . अशा कॅमेऱ्यांसाठी अंबानी उद्योग समूहाने आम्हाला साडे तीन कोटी रुपयांची मदत केलेली आहे . मोठ्या शहरांमधील मोठी रुग्नालये या रुग्नालयाशी आम्ही जोडलेली आहेत . टाटा हॉस्पिटल , हिंदुजा रुग्नालयातील निष्णात डॉक्टर्स येथील रुगांना मार्गदर्शन आणि सल्ला देतील . एचआयव्ही रुग्णाच्या स्वतंत्र डायलिसिसची सुविधा येथे असेल . आधुनिक लॅब आणि रक्तपेढी असेल . २०० प्रशिक्शित बिगर वैद्यकीय कर्मचारी नेमलेले आहेत . स्वच्छतेचे काम देशभरात नावाजलेल्या बीव्हीजी समूहाला दिलेले आहे हा समूह राष्ट्रपती भवन आणि संसदेच्या अशा कामांची जबाबदारी सांभाळणारा आहे . ७० रुपयात येथे एक्स रे काढला जाईल . औरंगाबादच्या हेगडेंवर रुग्णालयासारख्या राज्यातील मोठ्या रुग्नालयान्नी ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मदत आणि मार्गदर्शन केलेले आहे . एकुण २०० खाटांच्या या रुग्णालयात ४० आयसीयू खाटा आहेत . कोरोना चाचणी १३ मिनिटात करणारी यंत्रे आहेत, असेही ते म्हणाले .