जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील एकविरा हॉटेल जवळून वयोवृध्दाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोतीलाल भावलाल चौधरी (वय-६५) रा. चौघुले प्लॉट शनीपेठ जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. किरणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. २७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मोतीलाल चौधरी हे कामाच्या निमित्ताने राष्ट्रीय महामार्गावरील एकविरा हॉटेल समोर दुचाकी (एमएच १९ आर ९८८८) ने आले होते. त्यांनी हॉटेल समोर दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची पार्किंगला लावलेली ७ हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविली. त्यांनी परिसरातील सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर सोमवारी २९ ऑगस्ट रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिनेश पाटील करीत आहे.