हॅण्ड काँक्रीट मिक्सरच्या चाकाखाली आल्याने मजूराचा दुदैवी मृत्यू !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खुल्या जागेवर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम करत असतांना हॅण्ड काँक्रीट मिक्सर असलेले वाहन मागे घेत असतांना पुढच्या चाकाखाली आल्याने मजूराचा दबुन दुदैवी मृत्यू झाल्याची घटना ३० मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पिंप्राळ्यातील स्मशाभूमीजवळ घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अरूण वसंत बाविस्कर (वय-४४) रा. कांचन नगर, जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अरूण वसंत बाविस्कर हे पत्नी व मुलासह शहरातील कांचन नगरातील उज्ज्वल चौकात वास्तव्याला आहे. बांधकामाच्या ठिकाणी सेंटींगचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. जळगाव शहरातील पिंप्राळा स्मशानभूमीजवळील खुल्या जागेवर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्याठिकाण अरूण बाविस्कर हे देखील काम करत होते. गुरूवार ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू होते. यावेळी हॅण्ड काँक्रीट मिक्सर वाहन (एमएच १९ डीयू ४६६१) वरील चालक संजय राठोड रा. रामदेववाडी, जळगाव हा वाहन मागे घेत असतांना अरूण बाविस्कर हे पुढच्या चाकाखाली आल्याने त्याचा दबुन जागेवरच दुदैवी मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर चालक हा पसार झाला. दरम्यान, सोबत असलेल्या कामगारांनी तातडीने मृतदेह जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चालक संजय राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी सविता, तीन विवाहित मुली आणि सात वर्षाचा मुलगा शैलैश असा परिवार आहे.

Protected Content