एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल शहरातील ग्रामीण रूग्णालयाने ७२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज जिल्हा कोविड रूग्णालयाला सर्वांचा अहवाल प्राप्त झाला सर्व ७२ जणांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. हे वृत्ताने एरंडोलकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. असे जरी असले तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून कोरोनाचे लक्षणे जाणवताच तातडीने नजीकच्या ग्रामीण रूग्णालयात जावून तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
याबाबत माहिती अशी की, एरंडोल शहरातील मोठा माळीवाडा येथे एक ४५ वर्षीय रूग्ण आढळून आला होता. त्याचा उपचारादरम्यान २२ मे रोजी कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, कोरोनाबाधित अहवाल येण्यापुर्वी मयत रूग्णांने गावातील खासगी रूग्णालयात उपचार घेतले होते. प्रशासनाने तातडीने दखल घेत त्यांच्या संपर्कातील संशयित ७२ जणांचे स्वॅब त्याच दिवशी घेतले होते. आज जिल्हा कोविड रूग्णालयाला कोरोना अहवाल प्राप्त झाला असून सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे एरंडोलकरांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, नागरिकांनी कोरोनाची लक्षणे जाणवताच नजीकच्या ग्रामीण रूग्णालयात जावून तपासणी करून सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे.