भुसावळकरांनी आरोग्यासाठी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहर कोरोना हॉटस्पॉट ठरले असून नागरिकांनी आरोग्यासाठी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. भुसावळात ट्राम केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, आमदार संजय सावकारे, जिल्हा शल्य चिकित्स डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा कोविड नोडल अधिकारी नगरसेवक पिंटू कोठारी, नगरसेवक मनोज बियाणी, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता एस.यु.कुरेशी, कंत्राटदार योगेश पाटील यांच्यासह प्रशासकीय व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

नवोदय विदयालयात कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
भुसावळातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगत असलेलया ट्राम केअर सेंटरचे आज पालकमंत्री ना. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. सोबत नवोदय विद्यालयात कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करून येथील कर्मचारी व रूग्णांची विचारपूस केली.

Protected Content