हिंस्त्र प्राणी लांडग्याच्या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहराजवळ असलेल्या श्री महर्षी व्यास महाराज मंदीराच्या मागे असलेल्या आदिवासी झोपडपट्टीत हिंस्त्र लांडग्याने दीड वर्षाच्या बालकावर हल्ला करत पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तरूणाने लांडग्यासोबत झालेल्या झटापटीत तरूण जखमी झाला असून लांडगा ठार झाला आहे. जखमी तरूणावर यावल ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहरालगल असलेले श्री व्यास महाराज यांचे मंदिर आहे.  मंदीराच्या बाजुस असलेल्या स्मशानभुमीनजीक आदीवासी बांधवांची झोपडपट्टी आहे. सोमवारी १७ एप्रिल रोजी दीड वर्षाच्या चिमुकला गोलु भिल आपल्या आई जवळ असतांना त्या ठीकाणी अचानक हिंस्त्र प्राणी लांडग्याने हल्ला केला. आईजवळ असलेले बाळ पळविले. ही बाब लक्षात आल्यानंतर जवळ असलेला योगेश अनिल भिल (वय-२१) या तरूणाने धाडस दाखवत त्या बालकाची लांडग्याच्या तावडीतुन सुटका केली. या झटापटीत हिंस्त्र लांडग्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला.  यात लांडगा मारला गेला आहे. जखमी झालेल्या तरूणावर यावल ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.  घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावलच्या पुर्व वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर त्यांचे सहकारी व अभयरण्य विभागाच्या क्षेत्राचे चौहाण यांच्यासह उपास्थित होते. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी त्या तरुणावर उपचारासाठी आपल्यापरीने तात्पुरती आर्थिक मदत केली आहे .

Protected Content