पाचोरा, प्रतिनिधी । हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे १० वी व १२ वी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हिंदवी स्वराज्य संघटनेमार्फत पाचोरा तालुक्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी अध्यक्षस्थानी हिंदवी स्वराज्य संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष कमलेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक भाऊराव राऊत, जिल्हाध्यक्ष योगेश पाथरवट, शहरअध्यक्ष राहुल पाटील, तालुकाध्यक्ष सागर कोष्टी हे उपस्थित होते. स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेल्या युवकासारख आपल्याला बनायचय असल्यास अशाच प्रकारे मेहनत व अभ्यास करावा. असे मत युवक प्रदेशाध्यक्ष कमलेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.