विठूरायाच्या नामाचा जयघोष करीत जामनेर शहर झाले भक्तीमय

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त शहरातील लॉर्ड गणेशा स्कूल, एकलव्य माध्यमिक शाळा, जैन इंटरनॅशनल स्कूल यांच्यासह विविध शाळेच्या चिमुकल्याने आषाढी एकादशी निमित्त पुणे शहरातून पालखी व ग्रंथ दिंडी यामध्ये नगरपालिका चौकात विठुरायाचे पूजन व आरती जामनेर शहराच्या नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, न्यायाधीश दीपक पाटील, अभय बोहरा, अरुण उघडे आदी यावेळी उपस्थित होते. या दिंडीमध्ये जामनेर शहरातील नगराध्यक्ष, न्यायाधीश, पोलीस, तहसीलदार, पालिका मुख्यअधिकारी यांच्यासह विविध शासकीय सेवेतील अधिकारी विठुरायाच्या भक्तिमय वातावरणात रंगलेले पाहायला मिळाले. यावेळी चिमुकल्यांनी निसर्ग वाचवा, प्रदूषण टाळा, पाणी वाचवा यांच्यासह विविध संदेश या दिंडीच्या माध्यमातून शहरवासींना दिला.

Protected Content