हिंगोली (वृत्तसंस्था) हिंगोलीत एका दिवसात ‘कोरोना’चे तब्बल २६ नवे रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे यापैकी २५ जण हे राज्य राखीव पोलिस दलाचे जवान असल्यामुळे खळबळ उडाली आहे.
अवघ्या दहा दिवसांपूर्वी हिंगोली जिल्हा ‘कोरोना’मुक्त झाल्याची घोषणा झाली होती, मात्र इतक्या कमी दिवसात रुग्णसंख्या फोफावून पन्नाशीच्या उंबरठ्यावर आली आहे. हिंगोलीतील कोरोनाबधितांची संख्या गेल्या २४ तासात २१ वरुन थेट ४७ वर गेली आहे. यापैकी एका रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असून ४६ जणांवर उपचार सुरु आहेत. याआधी, हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्ट १६ एप्रिलला निगेटिव्ह आला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २१ एप्रिलला दुपारी चार वाजता हिंगोली जिल्हा ‘कोरोना’मुक्त झाल्याची घोषणा केली होती, मात्र अवघ्या साडेचार तासांमध्ये सहा नवे रुग्ण आढळले होते.