यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा गावाजवळील बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर मार्गावर रविवारच्या रात्री झालेल्या भिषण अपघातात १२ जणांचा दुदैवी मृत्यु झाला होता. या घटेनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मंगळवारी दुपारी घटनास्थळी रस्ते राज्य मार्गाचे पोलीस अधिक्षक डॉ. डिंगबर प्रधान ठाणे यांनी भेट दिली.
यावेळी नाशिकचे विभागीय पोलीस अधिकारी नजीर शेख, धुळ्याचे पोलीस निरीक्षक बच्छाव, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल मेढे पारधी, अफजल तडवी, गिरीष शिंदे, दत्तात्रय घाळवे यांनी पाहणी केली. असता सदरच्या घटनेचे गांर्भीय लक्षात घेण्यासाठी पाहणी केली जात आहे, अशी माहिती मुंबई येथील राज्य महामार्गाचे पोलीस अधिक्षक डॉ. डिंगबर प्रधान यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले. यावेळी अपघाताला कारणीभुत असलेल्या डंबर वाहनास जळालेल्या अवस्थेत क्रेन व्दारे घटनास्थाळावरून हटविण्यात आले आहे.