स्वस्तात सामान मिळवून देण्याचे आमिष; साडेचार लाखात फसवणूक

fraud 1

जळगाव प्रतिनिधी । कटलरी माल भरून देण्यासाठी शिर्डी येथील व्यावसायिकाने ऑनलाईनच्या माध्यमातून 4 लाख 88 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत महिती अशी की, खंडू शालिग्राम चौधरी मु. रा. कळमसरा ता.पाचोरा ह.मु.शिर्डी कालिकानगर ता.राहता जि.अहमदनगर यांची बहिण जळगाव येथे राहते. याचा शिर्डी येथे कटलरीचा व्यवसाय आहे. त्यांना या व्यवसायासाठी महिन्याला साधारणपणे 2 ते 3 लाख रूपयांचा माल मुंबईहून खरेदी करतात. तीन-चार महिन्यापुर्वी जळगावला आले त्यावेळी त्याची अमळनेर येथील बिरजू चौधरी यांच्याशी ओळख झाली. बिरजूने मुंबईतील त्याचा मित्र आकाश परदेशी हा कटलरीचा सामान मुंबईतून कमी किंमतीत तुला उपलब्ध करून देईल असे सांगितले. त्यावरून खंडू चौधरी यांनी बहिण, मित्र आणि यांच्याकडून पैसे जमवून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आकाश परदेशीला फोन लावून दोन लाख रूपये रोख दिले. त्यानंतर दोन दिवसात माल येईल असे सांगितले. अजून तीन लाख रूपयांची आवश्यकता असल्याने खंडू चौधरी यांनी सीडीएम मशिनीतून 2 लाख 88 हजार रूपये ऑनलाईन पाठविले. मात्र मुदतीत माल न आल्याने खंडू चौधरी यांच्या फिर्यादीवरून आकाश परदेशी यांच्या विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय वाघमारे करीत आहे.

Protected Content