रेल्वेने प्रवास करताय ? : ‘या’ गाड्या झाल्यात रद्द !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी आठवड्यात जर आपण रेल्वेने प्रवास करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. दोन दिवस मेगा ब्लॉक घेण्यात येत असल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून आपल्याला याची माहिती आवश्यक आहे.

जळगाव ते मनमाड दरम्यान तिसरी लाइन आणि यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १४ आणि १५ ऑगस्टला मेगा ब्लॉक घेतला आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणार्‍या अप – डाऊन मार्गावरील ३३ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून १९ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने एका प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून याची माहिती जाहीर केले आहे.

गाडी क्र. ११११३- देवळाली -भुसावळ एक्सप्रेस १४ व १५ रोजी देवळाली येथून सुटणारी गाडी रद झाली आहे.

गाडी क्र. ११११९ इगतपुरी -भुसावळ एक्सप्रेस १४ व १५ रोजी रद्द करण्यात आलेली आहे.

गाडी क्र. ०२१३१ पुणे – जबलपूर एक्सप्रेस १४ रोजी पुणे येथून सुटणारी एक्सप्रेस ही रद्द करण्यात आलेली आहे.

गाडी क्र. ०१०२५ – १२ रोजी दादरहून सुटणारी दादर – बलिया एक्सेस रद झाली आहे.

गाडी क्र. १२१३९ मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्स्प्रोस ही ट्रेन १४-१५ रोजी रद्द झालेली आहे.

गाडी क्रमांक १४४०१ मुंबई ते आदिलाबाद एक्सप्रेस १३ व १४ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.

यासोबत मुंबईच्या दिशेने जाणार्‍या खालील गाड्या रद्द झाल्या आहेत.

गाडी क्र, ११११४ – भुसावळ – देवळाली -१३ व १४ रोजी भुसावळला जाणारी.

गाडी क्र. १११२० भुसावळ – इगतपुरी -१४ रोजी भुसावळला जाणारी,

गाडी क्र. ०१०२६- ९३ आणि ९६ रोजी बलियाहून सुटणारी बलिया – दादर,

नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस १३-१४ रोजी रद्द आहे.

गाडी क्र. ०११४२ – आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस १४-१५ रोजी आदिलाबादहून
सुटणारी ट्रेन रद्द असेल.

गाडी क्र. १२११४ – नागपूर – पुणे एक्स्प्रेस १३ रोजी नागपूरहून सुटणारी एक्सप्रेस रद्द आहे.

गाडी क्र, ०१७ ५१ – १४ रोजी रिवा येथून निघणारी पनवेल एक्सेस रद्द झाली आहे.

गाडी क्र, १२१३६ – तागपूर-पुणे एक्सप्रेस ९४ रोजी नागपूरून सुटणारी ट्रेन रद्द झाली आहे.

गाड़ी क्र, ११०४० – गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र ९४ आणि १६ रोजी रद्द झालेली आहे.

अनेक प्रवाशांनी १५ ऑगस्टच्या दरम्यान प्रवासाचे नियोजन केलेले आहे. यात विशेष करून दुसरा शनिवार, रविवार, सोमवारची एक दिवसाची सुटी टाकून मंगळवार व बुधवारपर्यंत असे सलग ५ दिवस सुटी आली असल्याने प्रवासाचे जोरदार प्लॅनींग झालेले आहे. मात्र रेल्वेने मेगा ब्लॉक जाहिर केल्याने ज्यांनी आधीच या ट्रेन्सची तिकिटे बुक केली असतील त्यांना मात्र गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

Protected Content