लखनऊ : वृत्तसंस्था । हाथरस घटना मानवतेवरचा डाग आहे. आरोपीला फाशी देण्यात यावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित युवतीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या गुन्ह्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा अनेक राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. परंतु, रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आज अखेर रामदास आठवलेंनी आपले मौन सोडले.
रामदास आठवले म्हणाले कि, हाथरस घटना मानवतेवरचा डाग आहे. आरोपीला फाशी देण्यात यावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती या मुद्यावरून राजकारण खेळत आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा अधिकार त्यांना नाही, अशी टीका आठवले यांनी केली आहे.