हातेड बु येथील गॅरेजचे दुकान फोडून दोन लाखांचा मुद्देमाल लांबविला

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील हातेड बु । येथे मध्यरात्री मोटारसायकल स्पेअर पार्टचे दुकान फोडून दुकानातील २ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शिवाजी अशोक सनेर (वय-३१) रा. हातेड ता. चोपडा यांचे गावातील बसस्थानकाजवळ गॅरेजचे दुकान आहे. हे दुचाकी दुरूस्तीचे काम करतात. ८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांचे काम आटोपून दुकान बंद करून घरी निघून गेले. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री गॅरेज फोडून दुकानातील मोटारसायकलचे पार्टस् , टायर, ट्यूब, ऑईल आणि बॅटऱ्या असा एकुण २ लाख १२ हजार ४० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी शिवाजी सनेर दुकानावर आले असता चोरट्यांनी दुकान फोडल्याचे लक्षात आले. चोपडा ग्रामीण पोलीसांनी माहिती देण्यात आली असून चोरीचा पंचनामा करण्यात आला आहे. शिवाजी सनेर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजी बाविस्कर करीत आहे.

Protected Content