जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा भागात काहीही एक कारण नसतांना हातात तलवार, लाकडी दांडके घेवून दहशत माजवित आपापसात हाणामारी केल्याची घटना रविवारी २५ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील तांबापूरा परिसरात संशयित आरोपी सदबिरसिंग बलवंतसिंग टाक, बलवंतसिंग तेजसिंग टाक, दिपकसिग खेमचंदसिंग टाक, ईश्वरसिंग महेलसिंग टाक आणि नेपालसिंग मेहलसिंग टाक सर्व रा. शिकलकर वाडा, तांबापूरा, जळगाव हे रविवारी २५ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शिकलकर वाडा परिसरात हातात तलवार, लाकडी दांडके आणि इतर साहित्य घेवून आपापसात हाणामारी करून परिसरात दहशत निर्माण केली. दरम्यान, एमआयडीसी पोलीसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून कारवाई केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मुकेश आनंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी ६ वाजता सदबिरसिंग बलवंतसिंग टाक, बलवंतसिंग तेजसिंग टाक, दिपकसिग खेमचंदसिंग टाक, ईश्वरसिंग महेलसिंग टाक आणि नेपालसिंग मेहलसिंग टाक सर्व रा. शिकलकर वाडा, तांबापूरा, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.