मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या १९व्या दिवशी रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री, तरोडा, भानगुरा, घोडसगाव, कुंड येथील ग्रामस्थांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी ग्रामस्थां समवेत संवाद साधला.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, मुक्ताईनगर मतदारसंघ कायम एकनाथराव खडसे यांच्या पाठीशी उभा राहिला आहे नाथाभाऊनी या गावांना विकास कामांसाठी सतत निधी उपलब्ध करून दिला आहे, शेती रस्ते, व्यापारी संकुल स्मशान भूमी, सभामंडप, ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य उपकेंद्र, सर्व गावांना चहूबाजुनी डांबरी रस्त्यांनी जोडले आहे. गावा अंतर्गत विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला आहे.
एकनाथराव खडसे हे कृषी मंत्री असताना त्यांनी मुक्ताईनगर येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजुर करून आणले त्यासाठी शासनाला मोफत १०० एकर जमीन उपलब्ध करून दिली.
या महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील मुलांना तंत्रयुक्त शेती शास्त्रातील शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना शेतीतील नविन तंत्रज्ञानाची ओळख होण्यास भविष्यात मदत होणार आहे. हे शासकीय कृषी महाविद्यालय आपल्या भागासाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे.
आता तिन वर्ष एकनाथराव खडसे हे आमदार नसल्याने विकास थंडावला आहे. ५० खोके तुमच्या कामात येणार नाही. आता एकनाथराव खडसे हे विधानपरिषदेचे आमदार झाले आहेत राहिलेले विकास कामे त्यांच्या व पक्षाच्या माध्यमातून पुर्ण करण्यात येतील. यापुढेही आम्ही नेहमी काम करण्यात बांधील आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू, अशी ग्वाही रोहिणी खडसे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे, यात्राप्रमुख निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, कार्याध्यक्ष सोपान दुट्टे, माजी सभापती विलास धायडे, विकास पाटील, प्रदिप साळुंखे, जि.प. सदस्य निलेश पाटील, रामदास पाटील, रामभाऊ पाटील, चंद्रकांत बढे, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष नंदू हिरोळे, बाळाभाऊ भालशंकर, विजय भंगाळे, वासुदेव बढे, प्रा.डॉ. अतुल बढे, विजय कापसे, लिलाधर वानखेडे, सुभाष खाटीक, प्रविण दामोदरे, निलेश खोसे, अनंत खेवलकर, राजेंद्र सांगळकर, अशोक सोनवणे, किरण वंजारी, कडू माळी, सोपान कांडेलकर, विशाल रोठे, चेतन राजपुत, रवी सुरवाडे, भुषण धनगर आदी उपस्थित होते.
या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह
पिंप्री आकराऊत येथील सरपंच अशोक सोनवणे, उपसरपंच कडू भाऊ भिल, निलेश खोसे, सुभाष माळी, रतीराम पाटील, ब्रिजलाल मोरे,सुभाष कोळी, भागवत चोपडे, मुनाफ पिंजारी, मांगीलाल सोनवणे, अहमद मण्यार, तुळशीराम पाटील, शंकर माळी,संजय माळी, सुनिल माळी, भास्कर खोसे, शाम राव कोळी, मौसम पिंजारी, अंबादास माळी, समद भाई , प्रमोद पाटील, नारायण पाटील, संदिप पाटील,सचिन पाटील, रमेश मराठे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
तरोडा येथील
सरपंच योगेश गायकवाड, विजय पाटील, विलास वानखेडे, सोपान पाटील, विनोद पिवटे,कडूभाऊ गायकवाड,गजानन पारधी,विनोद निंबोळकर, गणेश वानखेडे, संदिप पिवटे,कांतीलाल चौधरी, श्रावण अवसरमोल,अशोक वानखेडे, संदिप पाटील,विजय गायकवाड, राजेंद्र कुंभार आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
भानगुरा येथील सुनिल पाटील, काशिनाथ पाटील, सुधाकर पाटील, आत्माराम पाटील, गजानन थेटे, विशाल पाटील, कृष्णा पाटील, नामदेव पाटील, शेनफड पाटील, साहेबराव पाटील, निवृत्ती पाटील, समाधान रायपुरे, भगवान रायपुरे,मारोती पाटील, नामदेव थेटे, विक्रम पाटील, अरुण पाटील, वसंत पाटील आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
कुंड येथील सुरेश तायडे, उमेश तायडे, गौतम हिरोळे, गोलू कवळे,विलास कवळे,विजय कवळे,नामदेव कवळे,टिना कचरे, तुळशीराम नेमाडे, पुंडलिक कवळे, उखर्डा बविसाने, सुनिल कवळे, भिमराव हिरोळे, जगदीश बविसाने, दिनकर भिल, विजय भिल, सुकलाल कवळे, शांताराम हिरोळे, सतिष हिरोळे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
घोडसगाव येथील
समाधान वन्नरे, अनंत खेवलकर, राजेंद्र सांगळकर, राजेंद्र दुट्टे,प्रभाकर धायडे,निलेश दुट्टे, गणेश मोरे, सुरेश खेवलकर, आशिष पटेल, पंढरी दांडगे, रविंद्र देशमुख, ज्ञानेश्वर सावळे, निना अटकळे,उत्तम दुट्टे,देवेंद्र लांडे, अभिमन्यु दांडगे, मिनाक्षीताई धायडे,वच्छलाताई दुट्टे,अनिता ताई धायडे,गोपाळ कोकाटे,ईश्वर भगत आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.