भुसावळ, प्रतिनिधी । रुग्णवाहिकेतील रुग्णांना ऑक्सिजनची सोय व्हावी म्हणून एक मोठे जंबो सिलेंडर सोबत इतर साहित्य डॉ. नितू पाटील यांच्या आई वैशाली तुकाराम पाटील यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे वडील तुकराम वासुदेव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव नेत्रालय, वरणगावतर्फे रोहन चंद्रभान भोई यांनी आपल्या वडिलांच्या स्व. शहीद करोना योद्धा कै. चंद्रभान काशिनाथ भोई यांच्या स्मरणार्थ वरणगाव शहर व भुसावळ तालुक्यातील सर्व नागरिकांच्या सेवेसाठी श्री राम नवमी पासून Ac/non Ac नवीन रुग्णवाहिका सुरू केली आहे. त्यात रुग्णांसाठी प्राणवायू ऑक्सिजनची सोय व्हावी म्हणून एक मोठे जंबो सिलेंडर सोबत इतर साहित्य वासुदेव नेत्रालय,वरणगाव संचालक तथा भारतीय जनता पार्टीचे ,वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नीतू पाटील यांचे वडील तुकाराम वासुदेव पाटील यांच्या हस्ते भेट देण्यात आले. यावेळी नगरसेवक राजेंद्र चौधरी,इंतोड फार्मासुटीकलचे विभाग प्रमुख राहुल चौधरी, कपिल राणे,साजन गवळी, दीपक फेगडे, राहुल कोचुरे, आमीन शेख, मझर शेख, मुन्ना सतावकर सहकारी उपस्थित होते. रोहन यांनी सुरू केलेली प्राणवाहिका ही काळाची गरज असून त्याच्या ह्या कार्यात आणि वरणगाव मधील रुग्णांसाठी ही ऑक्सिजन सेवा जीवनदायी ठरो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. प्रभु श्री राम नवमीनिमित्ताने प्राणवाहिक लोकार्पण तर आज हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने मोठे जंबो सिलेंडर भेट देण्यात आले.