Home धर्म-समाज पाचोऱ्यात माकडांचा धुमाकूळ; नागरिक त्रस्त, वाहनांचे नुकसान

पाचोऱ्यात माकडांचा धुमाकूळ; नागरिक त्रस्त, वाहनांचे नुकसान


पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा शहरात माकडांनी मोठ्या प्रमाणावर धुमाकुळ घातला आहे. यामुळे मोटारसायकली, चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान केले जात आहे.

शहरातील चिंतामणी कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, जयकिसान कॉलनी, मौर्यानगर सह परिसरात माकडांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असुन यात माकडांनी अनेक मोटरसायकल, चारचाकी वाहनांचे नुकसान करत आहे. तसेच घरातील छतांवर वाळत टाकलेल्या धान्य, भुईमूग शेंगा व इतर साहित्यांची नासधुस करुन अनेक घरांच्या खिडक्यांचे काच देखील माकडांनी फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरामुळे महिला, लहान बालकांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे वन विभागाने लक्ष देवुन या मोकाट माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


Protected Content

Play sound