जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा परिसरातील गुलाब बाबा कॉलनी येथून हद्दपार आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या दरम्यान अटक केली आहे. शाहरुख जवूर खाटीक असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील गुलाब बाबा कॉलनी येथील रहिवासी शाहरुख खाटीक याच्यावर एकूण नऊ गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला जळगाव शहरातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. सोमवारी रात्री जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वतीने ही हद्दीत कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले. यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास कारवाई करत असताना हद्दपार असतानाही शाहरुख खाटीक हा जळगाव शहरात मिळून आला. त्यामुळे त्याला अटक करण्यात येऊन त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी , पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ मुंडे , सतीश गर्जे, चंद्रकांत पाटील , होमगार्ड किरण जोशी , होमगार्ड पंकज सापकर, यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे