जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी पोलीस हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवित असतांना हद्दपार असलेले तीन संशयितांना अटक केली. तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या आदेशान्वये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिन आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (वय-२३) रा. शिकलकर नगर, रिजवान शेख उर्फ कालया गयासोद्दीन शेख (वय-२२) रा. अजमेरी गल्ली, तांबापुरा आणि अफजलखान उर्फ फावड्या रशीद खान (वय-२४) रा. शाहुवालीय मशीद हे संशयास्पदरित्या मेहरूण स्मशानभूमीजवळ चेहरा झाकून फिरतांना आढळून आले. तिघांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यान्वये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३५ हिस्ट्रीशीटर, १५ रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची तपासणी करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.ना. नितीन पाटील, पो.ना.सचिन मुंढे, दिपक चौधरी, मुद्दस्सर काझी, पो.कॉ. सतिष गर्जे, पो.कॉ. किशोर बडगुजर, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. योगेश बारी आदींनी कारवाई केली.