हज कमिटी ऑफ इंडियाने रद्द केले सर्व अर्ज

 

नवी दिल्ली । वृत्तसंस्था । कोरोनामुळे अनेक धार्मीक कार्यक्रमावर बंदी घालन्यात येत आहे.  करोनामुळे यावर्षीही हज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रा २०२१ चे सर्व अर्ज रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील लोक सर्वात पवित्र आणि महत्त्वपूर्ण हज यात्रेवर जाऊ शकणार नाहीत.

 

सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने कोरोना साथीमुळे इतर देशांतून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज यात्रेवर बंदी घातली आहे. सौदी अरेबिया केवळ ६० हजार स्थानिक लोकांना कोरोनामुळे हज करण्यास परवानगी देईल.

 

 

वाढता संसर्ग लक्षात घेता हज कमिटी ऑफ इंडियाने हज २०२१ साठीचे सर्व अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम समाजातील लोकांना आता हजसाठी १ वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

Protected Content