यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील हंबर्डी गावात १० दिवसानंतर पाणीपुरवाठा केला जात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा अशी मागणीचे निवेदन यावल पंचायत समितीवर गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात गटविकास अधिकारी येत नसल्याने आणि ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
यावल तालुक्यातील हंबर्डी गावात गेल्या अनेक वर्षांपासून मुबलक स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे या करीता ग्रामस्थसंघर्ष करीत आहे. शासनाच्या वतीने ग्रामस्थांचे पाणीप्रश्न मार्गी लागावे या साठी अटलभुजल योजने अंतर्गतचे सुमारे २ कोटी रूपयांचे काम मंजुर असुन हे कासवगतीने होत असुन अद्याप पूर्ण झालेले नाही. या कामाच्या होणाऱ्या दिरंगाईचा त्रास गावकऱ्यांना भोगावे लागत आहे. या कामास होणाऱ्या विलंबाची देखील चौकशी करण्यात यावी, ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन दहा दिवसा आड गावात पाणी पुरवठा करण्यात येतो ते देखील मुबलक व सुरळीत प्रमाणावर होत नसल्याची ओरड ग्रामस्थांची आहे .
गावात ग्रामपंचायतीवर होणाऱ्या पाणीपुरवठ्या बाबत विचारण्यास गेलेल्या ग्रामस्थांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. गावात पाणी पुरवठा करण्या संदर्भात ग्रामपंचायतीकडे कुठले ही नियोजन नाही. गावातील अवैद्यरित्या जोडण्यात आलेले नळ कनेक्शन त्वरीत तोडण्यात यावे. , तसेच गावातील काही मंडळींनी प्रमुख पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनी पाईपलाईनवर नळजोडणी केले असल्याने त्याचा परिणाम गावात होणाऱ्या ईतर ठीकाणच्या पाणीपुरवठयावर होत असुन , अनेक दिवसापासून प्रलंबीत पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवुन मुबलक पाणीपुरवठयाचे नियोजन न झाल्यास ग्रामस्थ मंडळी ही ग्रामपंचायत समोर उपोषणास बसणार असल्याचे ग्रामस्थानी यावलचे निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .
याप्रसंगी विजय बाविस्कर, मुरलीधर तळेले, गोकुळ तायडे, दिलीप फालक, विवेक पाटील, नितिन मेढे, प्रमोद पाटील, राजेश नेहते, प्रमोद पाटील, रोहन नेमाडे, प्रविण पाटील, वासुदेव दामु पाटील, राजेन्द्र बेंडाळे, विकास झाल्टे, वसंत तेली, भरत नेमाडे, अलका आसकर, साधना नेमाडे, कल्पना पाटील, छाया पाटील, उर्मिला पाटील, रजनी बेंडाळे, रत्नमाला फालक , मोनाली आसकर, भारती सोनवणे, वासंती तायडे, मोहिनी पाटील यांच्यासह अनेक महिला व ग्रामस्थांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.