महावितरण प्रशासनाने आंदोलकांकडे फिरविली पाठ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरणने तंत्रज्ञांच्या केलेल्या प्रशासकीय बदल्या ह्या नियमबाह्य असल्याने कामगारांनी प्रशासनाविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मात्र प्रशासनाने पाठ फिरवली. त्यामुळे कामगारांत संताप पसरला आहे. दरम्यान, आंदोलन प्रशासकीय दिवशी सोमवारीदेखील सुरु राहणार आहे.

प्रशासकीय बदल्या व विनंती बदल्यांसंदर्भात कंपनीचे निश्चित धोरण परिपत्रक ५१४ मध्ये नमूद आहे. मात्र या परिपत्रकाला महावितरण जळगाव विभागाने धाब्यावर ठेवले आहे. या परिपत्रकात बदल्यांबाबतचे मार्गदर्शन तत्त्वांचे उल्लंघन करून वरिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या १५ कर्मचाऱ्यांचे आणि तंत्रज्ञ पदाच्या ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या नियमबाह्य करण्यात आलेल्या आहेत. महावितरणच्या जळगाव विभागाने प्रशासकीय बदल्या ह्या नियमबाह्य पद्धतीने केल्या असून या बदली प्रक्रियेची चौकशी होईस्तोवर त्याला स्थगिती मिळणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या मुजोर व मनमानी पद्धतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरु होते.

दरम्यान, दुसऱ्याही दिवशी महावितरणच्या एकही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट दिलेली नाही. त्यामुळे कामगारांविषयी कंपनी प्रशासनाला आस्था आहे कि नाही असा प्रश्न विचारला गेला आहे. आंदोलनात विभागीय, सर्कल, झोन अशा तिघी कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

Protected Content