जळगाव प्रतिनिधी । सौ. रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात दि पूर्व हिंदी शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक स्व. शेठ भिकमचंदजी जैन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
सौ. रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात स्व. शेठ भिकमचंदजी जैन यांच्या जयंतीसह लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर व लढवय्ये अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.याप्रसंगी अनेक मान्यवरही उपस्थित होते.