जळगाव, प्रतिनिधी । जळगाव आगारातील वाहक स्व. मनोज अनिल चौधरी यांच्या वारसास एस. टी. कामगार सेनेतर्फे १ लाखांची मदत देण्यात आली.
स्व. मनोज चौधरी यांच्या वारसांना एस. टी. कामगार सेनेतर्फे १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, मनपातील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे , उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, एस. टी. कामगार सेनेचे आर.के. पाटील , गोपाळ पाटील, दिलीप सूर्यवंशी व प्रविण कूमावत आदी उपस्थीत होते.