कुसुंबा गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; एमआयडीसी पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कुसुंबे ता. जि.जळगाव ४४ वर्षीय व्यक्ती खासगी कंपनीत कामाला आहे. ते आपल्या पत्नी, मुलगा आणि १६ वर्षाची मुलगी सोबत राहतात. शनिवार ५ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सर्वजण रात्री १२ वाजता झोपले. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारा मुलाला झोपेतून जाग आली. जागेवर बहिण झोपलेली दिसून आली नाही म्हणून सर्वांना उठविले. घराच्या बाहेर व गावात सर्वत्र शोधाशोध केली मात्र मिळून आली नाही. मागच्या घराची कडी उघडलेली दिसून आले. रविवारी देखील दिवसभर मैत्रीण, नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला मात्र मिळून न आल्याने सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गजानन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द पळवून नेल्याप्रकरणी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content