Home क्राईम अवैध वाळूची वाहतुक करणा-या टॅक्टर-ट्रॉलीवर कारवाई

अवैध वाळूची वाहतुक करणा-या टॅक्टर-ट्रॉलीवर कारवाई

0
54

 

रावेर, प्रतिनिधी । आज पहाटे रावेर पोलिसांनी अवैध वाळूची वाहतुक करणा-या टॅक्टर-ट्रॉलीवर कारवाई केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत वृत्त असे की, आज सकाळी पहाटेच्या सुमारास रावेर पोलिसांनी पुनखेड़ा नजिक अवैध वाळूने भरलेले टॅक्टर-टॉलीवर कारवाई केली आहे. ही कारवाई पोलिस नाईक नितिन डांबरे, पो. कॉ. सुरेश मेढे, पो. कॉ. उमेश नरवाडे यांच्या पथकाने केली आहे. नितिन डांबरे यांच्या फिर्यादी वरुन रावेर पोलिसात भादवी कलम ३७९ तसेच गौण खनिज कायदा कलमा अंतर्गत देखील कारवाई केली असून आरोपी अटकेत आहे.


Protected Content

Play sound