स्वामीनारायण गुरुकुलात मारुतीला कोरोना निर्मूलनासाठी साकडे

 

 

 फैजपूर, प्रतिनिधी । सावदा येथील स्वामीनारायण गुरुकुलात  महावीर कष्टभंजन देव हनुमानजी यांच्या जनमोत्सव  शुभप्रसंगी श्री मारुती यज्ञाचे  आयोजन करून सव्वा लाख आहुतीद्वारे मारुतीला कोरोना निर्मूलनासाठी साकडे घालण्यात आले.

कोरोना महामारीच्या समूळ नाशासाठी व सर्व नागरिकांच्या निरामय आयुष्यासाठी प्रशासन, वैद्यकीय मंडळी तसेच समाजसेवकांना द्वारे अनेकानेक प्रयत्न होत आहे. वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका व सहकारी रात्रंदिवस आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी  प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळावे व या कोरोना महामारीचा समूळ नायनाट व्हावा यासाठी महावीर कष्टभंजन देव हनुमानजी यांच्या जनमोत्सव  शुभप्रसंगी श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्था औद्योगिक वसाहत सावदा येथे संस्थेच्या गोशाळेच्या शुचिर्भूत जागेवर दिनांक २६ व २७ एप्रिल या दोन दिवशी श्री मारुती यज्ञाचे आयोजन करण्यात आले. 

हा यज्ञ समारंभ जळगाव येथील प्रसिद्ध पुरोहित श्रीमान प्रा. श्रीकांत रत्नपारखी (गुरुजी) व त्यांचे सहकारी गण यांच्या हस्ते  शास्त्रोक्त मंत्र व पूजाविधीनुसार करण्यात आला.  या यज्ञास गुरुकुलचे शास्त्री भक्ती किशोरदासजी, शास्त्री भक्तीस्वरूप दासजी, शास्त्री विश्व प्रकाशदासजी, स्वामी लक्ष्मीनारायण दासजी, स्वामी सत्यप्रकाश दासजी, पार्षद दीपक भगत व संत मंडळीच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी यजमान सुनील देवराम चौधरी रा. न्हावी, जितेंद्र मिठाराम चौधरी पिळोदा पी. डी. पाटील, प्राचार्य संजय वाघुळदे, पत्रकार प्रा. उमाकांत पाटील, नंदू अग्रवाल, मनोज होले उपस्थित होते.  या यज्ञ कार्यावेळी पुरोहित, मुख्य यजमान, शास्त्रीजी या पुजकांशिवाय  इतर कोणालाही प्रवेश नव्हता. शासन नियमाचे या ठिकाणी काटेकोर पालन करण्यात आले.

 

Protected Content