जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने बिग बाजार येथे जळगाव महापालिकेच्या वतीने चित्रप्रदशानाचे उद्घाटन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या आदेशान्वये देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले आहे. यात विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून नागरीकांमध्ये देशाची भावना निर्माण होण्यासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. या अनुषंगाने जळगाव महापालिकेच्या वतीने शहरातील बीग बाझार परिसरात चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता याचे उद्घाटना मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहाय्यक आयुक्त प्रशांत गोसावी, नगरसेविका सुचिता हाडा, माजी महापौर भारती सोनवणे यांच्यासह आदी उपस्थित होते.
देशाच्या फाळणीत जे काही प्रसंग देशवासीयांसोबत घडले होते. या घटनेबाबतची संपुर्ण माहिती चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून केली गेली आहे. असा प्रकारचा दुदैवी प्रसंग देशात पुन्हा येवू नये. अनेकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.