नवी दिल्ली (वृत्तसंस्था) स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणे असा होत नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे. एका पुस्तकांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
प्रा. राजेंद्र गुप्ता यांच्या दोन पुस्तकांचे डिजिटल माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोहन भागवत पुढे म्हणाले की, ‘स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही’ असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ज्ञानासंबंधी जगभरातू चांगले विचार आले पाहिजेत. वैश्विक कुटुंब म्हणून जग समजून घेण्याची आणि स्वावलंबनासह सद्भावनेनं सहकार्य करण्याची गरज आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर याचा अर्थ असा नाही की विदेशी वस्तूंवर सरसकट बंदी घालावी. जगभरात ज्या गोष्टी चांगल्या आहेत आणि ज्याची देशात कमतरता आहे अशा गोष्टी आयात करता येऊ शकतात. अनुभवावर आधारित ज्ञानाला पुढे आणण्याची आवश्यकता आहे. विदेशी वस्तूंवर केवळ अवलंबून राहू नये. जर तसे करायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या अटी आणि शर्तींवर ही गोष्ट करायला हवी असे देखील श्री. भागवत म्हणाले.