स्मशानभूमीतच गृहस्थाने केले असे काही. . .परिसरावर शोककळा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसोली येथील गृहस्थाने स्मशानभूमीतच आपली जीवनयात्रा संपविल्याची वेदनादायी घटना घडली आहे.

 

शिरसोली येथील संजय हरी पाटील हे ट्रक चालक होते. संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान त्याने पत्नी व भावांना शिर्डी येथे दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र शिर्डीला न जाता शिरसोली गावातील स्मशानभूमीच्या शेडमध्ये ते आले.या ठिकाणी शर्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

 

  •  ही बाब गावातील गोलू पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी घटनेची माहिती पोलीस पाटील शरद पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. मयत संजय हरी पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी आई-वडील व तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content