पवारांना समजून घेण्यासाठी भाजपला १०० वर्षे लागतील ! : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पहाटेच्या शपथविधीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतांनाच खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी शरद पवारांचे कौतुक करत भाजपवर जोरदार टिका केली आहे.

 

देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या सध्या २०१९ सालच्या पहाटेच्या शपथविधीवरून कलगीतुरा रंगला आहे. आज पत्रकारांशी बोलतांना खासदार संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, याबाबत शरद पवारांनी जे काही सांगितले आहे ते सत्य आहे. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शरद पवारांनी एकाचवेळी टाकलेली ती गुगली आणि सिक्सर दोन्हीही होते. शरद पवारांच्या या गुगलीवर देवेंद्र फडणवीस व त्यांचा भाजप पक्ष पुरता क्लिन बोल्ड झाला.

 

संजय राऊत म्हणाले, २०१९च्या विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ही राष्ट्रपती राजवट कशी उठवावी, याबाबत आम्ही सर्वच जण चिंतेत होतो. शरद पवार, उद्धव ठाकरे आम्ही सर्वजण याबाबत वारंवार चर्चा करत होतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तीन पक्षांचे बहूमत मानणार नाहीत, वेळकाढू पणा करतील, केंद्र सरकार व राज्यपाल आम्हाला झुलवत बसतील, अशी आम्हाला खात्री होती. याचमुळे शरद पवार यांच्या चातुर्यामुळे पुढील घटनाक्रम घडला.

 

दरम्यान,  संजय राऊत म्हणाले, २०१९मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवण्याबाबत आम्हा नेत्यांमध्ये वारंवार चर्चा होत होत्या. तेव्हाच शरद पवारांनी गुगली टाकली आणि भल्या पहाटे बातमी आली की राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली. पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांनी टाकलेली गुगली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस क्लिन बोल्ड झाले. शरद पवारांना सजून घेण्यासाठी भाजप नेत्यांना १०० वर्षे लागतील असा टोला राऊत यांनी मारला.

Protected Content