स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थांनी केला गुरुजनांचा सत्कार

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चांगदेव येथील श्री.एस.बी.चौधरी  हायस्कूल येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

 

श्री.एस.बी.चौधरी  हायस्कूल येथे इयत्ता १०  वी बॅच २००३-२००४  चे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच सर्व आजी माजी शिक्षक  यांच्या उपस्थितीत स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शाळेचे संचालक अंकुश चौधरी, मुख्याध्यापक विजय श्रीराम चौधरी, निवृत्त शिक्षक श्री.लढे , निवृत्त शिक्षक श्री.विजय सर, श्री.सोनवणे सर, श्री.साळी सर, डी एस पाटील , श्री.बेलदार सर, सी. जे. पाटील, श्री.उदय सर, श्री.निंबाळकर सर, श्री.कृष्णा भाऊसाहेब, .जगन्नाथ भाऊसाहेब व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचे स्वागत व सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मनोगत आणि शाळेबद्दल आभार व्यक्त केले. मुलींच्या वतीने दुर्गा भोई, सोनाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुलांपैकी नवनिश महाजन, मोहन जाधव, स्वप्निल चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन स्नेहल पाटील  यांनी केले तसेच आभार  भुषण महाजन यांनी मानले. या मैत्री मेळाव्यात ५०  विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व मित्रांचे सहकार्य लाभले.

 

Protected Content