सौखेडासिम येथे ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिकाच्या हस्ते करा : तरुणांची मागणी

यावल,  प्रतिनिधी तालुक्यातील सौखेडासिम  ग्रामपंचायतीत व जिल्हा परिषद मराठी शाळेत सेवानिवृत्त सैनिक किवा पोलीस किवा तस्सम अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे अशी मागणी येथील तरुणांनी सरपंच व जि. प. शाळेच्या मुख्यध्यापिका यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  

 

सौखेडासिम गावातील तरुणांनी  विकास पाटील व जिल्हा परिषद शाळेच्या प्रभारी मुख्यध्यापक विद्या फेगडे यांना निवेदन देत शाळा व ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण हे पदाधिकारी यांनी न करता सेवानिवृत्त फौजी किवा पोलीस किवा तस्सम अधिकारी यांनी केल्यास आपल्या गावाचे नाव पुर्ण पंचक्रोशीत अभिमानाने व कौतुकाने घेतले जाईल. तरी आपण सदर निवेदनाचा गांभिर्याने विचार करावा हि विनंती या निवेदनावर मुस्तूफा रमजान तडवी, दगेखाँ निजाम तडवी, हुसेन रुबाब तडवी,  बिस्मील्ला हुसेन तडवी, सिराज याकूब तडवी, न्याजोद्दिन सत्तार तडवी, तनविर दगेखाँ तडवी, अलताब महेमूद तडवी, आमिन अय्यूब तडवी, आसिफ राजु तडवी, आरिफ छब्बीर तडवी, मुनाफ खलिल तडवी यांच्यासह गावातील अनेक तरुणांच्या या मागणी निवेदनावर साक्षऱ्या आहेत.

 

Protected Content