सोनबर्डी येथील आश्रमशाळेत गरजूंना मोफत धान्य वाटप

कासोदा प्रतिनिधी । कोराना आजाराने देशात मोठे थैमान घातले आहे. त्यामुळे रोजंदारी करणाऱ्या कामागारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. येथून जवळ असलेल्या सोनबर्डी येथील आश्रमशाळेत गावातील गरजूंना मोफत धान्य वाटप करण्यात आले.

केंद्र सरकार व राज्य सरकार अहोरात्र प्रयत्न करून सामान्य लोकांपर्यंत दैनंदिन गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी घेत आहेत तशीच एक जबाबदारी म्हणजे सोनबर्डी येथील शासकीय आश्रमशाळेत शिल्लक असलेल्या अन्नधान्य कडधान्य व किराणा साहित्याचे वाटप करण्याचा आदेश एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी काढल्याने गावातील स्थानिक वंचित गरजू अपंग व मतिमंद आदिवासींना धान्य साठा गावातील ३६ कुटुंबांना देण्यात आला. सोशल डिस्टन ठेवून वाटप करण्यात आले. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पी.जी. पाटील, अधीक्षक जी.एस.गवळी, पूजा जाधव, पोलीस पाटील शरद पाटील, ग्रामसेवक पी.ए.पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भानुदास बागडे, एस. बी. पाटील, एल.एम. पाटील, हटकर सर, ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर पाटील, विनोद पाटील, ग्रामस्थ व शिक्षक कर्मचारी वृंद तसेच पत्रकार भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content