सैराटमधल्या ‘आर्ची’चा येतोय नवा चित्रपट

मुंबई : वृत्तसंस्था । रिंकू आता पुन्हा एकदा एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. रिंकू राजगुरुची ‘हंड्रेड’ ही हिंदी वेब सिरिज फारशी यशस्वी ठरली नाही. पण आता अ‍ॅमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवरील ‘अनपॉज्ड’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सैराटमध्ये आर्चीच्या भूमिकेमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु काही दिवस चर्चांपासून दूर आहे. सैराट सिनेमातून तिने अवघ्या महाराष्ट्राला ‘याड’ लावलं. तिच्या अभिनयामुळे ती स्टार झाली. महाराष्ट्रात बुलेट चालवणाऱ्या आर्चीची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली.

सैराट सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आलं. सैराटच्या यशानंतर रिंकू भरपूर सिनेमे करेल असेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती, पण तिने आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिले. हल्ली ती आपली शैक्षणिक जबाबदारी सांभाळून ती चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसते. सोशल मीडियावरही ती खूप अ‍ॅक्टिव्ह असते. पण सध्या रिंकू एका नव्या चित्रपटामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.

या चित्रपटात रिंकू एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. गुरुवारी अ‍ॅमेझॉन प्राइमने ‘अनपोज्ड’चा टीझर रिलीज केला. ‘अनपॉज्झ’मध्ये पाच शॉर्ट फिल्म्स एकत्र असणार आहेत.

या ५ शॉर्ट फिल्म्सचे दिग्दर्शन पाच वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी केले आहे. राज अँड डीके, निखील अडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या मेहरा अशा पाच गुणवंत दिग्दर्शकांनी दिग्शर्दित केलेल्या शॉर्ट फिल्म्स या चित्रपटात दाखवल्या जाणार आहेत.

यापैकी तनिष्ठा चॅटर्जीचे दिग्दर्शन असलेल्या शॉर्ट फिल्ममध्ये रिंकू राजगुरू दिसणार आहे. तिचा एक वेगळाच लूक टीझरमध्ये दिसतो आहे. तिच्यासोबत लिलिट दुबेदेखील अभिनय करणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर ८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. तर चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर १८ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Protected Content