Home क्राईम अज्ञात माथेफिरूने दुचाकी पेटविली ; शहर पोलीसात गुन्हा

अज्ञात माथेफिरूने दुचाकी पेटविली ; शहर पोलीसात गुन्हा


जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील धनाजीकाळे परिसरात मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी दुचाकीला पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, विनोद संभाजी पाटील (वय-२२) रा. संदीप किराणा दुकानाजवळ शिवाजी नगर, धनाजी काळे नगर हे हातमजूरी करून काम करतात. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीटी ०५२९) क्रमांकाची दुचाकी आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांनी घराच्या पार्किंगमध्ये होडा शाईन दुचाकी पार्किंगला लावली होती. ५ डिसेंबर रोजीच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दुचाकीवर काहीतरी टाकून पेटवून दिली होती. हा प्रकार आजूबाजूच्या नागरीकांच्या लक्षात येता आरडाओरड करून आग विझविण्यात आली. मात्र ३५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल पुर्णपणे जळून खाक झाली होती. विनोद पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. विनोद पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय झाल्टे करीत आहे.


Protected Content

Play sound