जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सेवानिवृत्त पोलीस बांधवांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी शांतिदूत पोलीस सेवा संस्थेच्या वतीने गुरुवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. त्यांच्या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे की, जळगाव जिल्ह्यातील शांतिदूत पोलीस सेवा संस्था आणि सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आतापर्यंत संघटनेच्या वतीने अनेक निवेदने पत्रव्यवहार करण्यात आला. या पत्रव्यवहाराला अद्यापपर्यंत शासनाकडून कोणतीही कार्यवाही व प्रश्न सोडवण्यात आलेले नाही. त्यामुळे गुरुवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यामध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, मोफत मेडिकल सुविधा, पीएसआय पदाच्या तिसऱ्या पदोन्नती पात्र असलेल्या सेवानिवृत्त बांधवांना अर्थीक लाभ मिळावा, सेवानिवृत्तीनंतरची आर्थीक रक्कम त्वरीत मिळावी. उशीरा मिळाल्यास ती व्याजासकट मिळावी.
शासकीय कामासाठी प्रवास करताना टोल नाक्यावर माफी मिळावी, सेवानिवृत्त पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीत २५ टक्के आरक्षण द्यावे, शिक्षक व पदवीधर मतदार संघाप्रमाणे पोलीस मतदार संघाची निर्माण करण्यात यावी, बस, पीएमटी, रेल्वे विमान प्रवासात ५० ते ७५ टक्के सूट मिळावी, यासह इतर प्रलंबित मागण्या शासनाने तातडीने मंजूर करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/623275156261286