एकलव्य संघटनेचे “बिऱ्हाड आंदोलन” (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पूर्वीपासून आदिवासी बांधव बेघर व भूमिहीन असल्यामुळे आदिवासी भिल्ल समाज गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहे. व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीसाठी कसत आहे. आता शासनाकडून गायरान जागा खाली करण्यासाठी अतिक्रमण काढण्यात येत आहे. या अतिक्रमण काढण्याला स्थगिती मिळावी, या मागणीसाठी गुरुवार ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकलव्य संघटनेच्या वतीने ‘बिऱ्हाड आंदोलन’ करण्यात आले.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे. हा समाज सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर मागासलेला असल्यामुळे आज देखील स्वतःची राहण्याची जागा उपलब्ध नसल्यामुळे आदीवासी समाज सरकारी गायरान जागेवर पिढीजात अतिक्रमण व वहिवाट करून राहत आहे. त्यांना शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ अद्यापपर्यंत मिळालेला नाही, तसेच काही प्रमाणावर आदिवासी समाजाने आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी दोनपट्टे सरकारी गायरान जमिनीवर शेतीसाठी रोजगार मिळवण्यासाठी शेती कसत आहे. जेणेकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल परंतु सध्या शासनाकडून हे अतिक्रमण काढून आदिवासी बांधवांना मोठा अन्याय केला जात आहे. त्यामुळे गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याला स्थगिती देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवार ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ, जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, तालुकाध्यक्ष राहुल ठाकरे, वाल्मीक सोनवणे, विलास मोरे, राजेंद्र वाघ, संजय पवार, गणेश गायकवाड, संजय मोरे, वसंत सोनवणे यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने बिऱ्हाड आंदोलनात सहभागी झाले होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/700223271511060

Protected Content