सेवानिवृत्त जवान शिवाजी शिंदे यांचा आमदार व महापौर यांच्याहस्ते नागरी सत्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ईश्वर कॉलनी येथील आर्मी सैनिक शिवाजी सुभाष शिंदे हे २६ वर्ष प्रदीर्घ देशसेवा देऊन नुकतेच १ जुलै रोजी मणिपूर येथून निवृत्त झाले. याप्रसंगी रेल्वे स्टेशन जवळ भव्य नागरी सत्कार आमदार राजूमामा भोळे व महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.

 

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे महानगराध्यक्ष व जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता एच. एच. चव्हाण, नगरसेवक कुंदन काळे, नवयुवक मराठा विकास मंडळाचे अध्यक्ष संजय मराठे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन सरोदे हे उपस्थित होते.

 

जवान शिवाजी शिंदे यांचे रविवारी २ जुलै रोजी सकाळी ७ वाजता रेल्वे स्टेशनवर आगमन झाले, यावेळी त्यांचे आप्तस्वकीय व नातेवाइकानी फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांचे स्वागत केले. यानंतर शहरातील चिमुकले राम मंदिर वरून सुशोभित केलेल्या व तिरंगाने सजलेल्या जीपमधून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “वीर जवान तुझे सलाम”,जय जवान जय किसान अशा घोषणांनी शहरातील रस्ते दुमदुमून गेले होते. यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी त्यांचे औक्षण व रांगोळी काढण्यात आली होती.

 

यानंतर सत्कारार्थी शिवाजी शिंदे यांनी मनोगत व्यक्त करतांना आतापर्यंत देशाची सेवा करत आलेले विविध चित्तथरारक अनुभव व शौर्य गाथा सांगत असताना सर्वांचे डोळे पाणावले. यावेळी प्रत्येकाच्या अंगावर काटा येत होता. त्यांच्या मनोगतातून सैनिक हा कधीच निवृत्त होत नसतो त्याच्या रक्तात देशसेवा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू असते असे सांगून यापुढे ही सिव्हील लाईफमध्ये देखील मी विधायक व सामाजिक कार्यासाठी नेहमी पुढे राहील असे सांगितले.

Protected Content