बंद घर फोडून ७५ हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील घरफोड्यांचे सत्र थांबतच नसून, वाघनगर भागातील पायल तडवी चौक परिसरातील एका बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून ७५ हजारांचा ऐवज लांबविल्या घटना रविवारी सकाळी उघडकीला आले. याबाबत दुपारी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, वाघ नगर परिसरातील पायल तडवी चौकात तापी पाटबंधारे विभागात क्लर्क या पदावर असलेले भुषण प्रल्हाद श्रीखंडे हे आपल्या पत्नीसोबत वास्तव्याला आहेत. ते गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला एका कामानिमित्त गेले होते. त्यामुळे घर दोन दिवसांपासून बंदच होते. बंद घर असल्याची संधी साधत शनिवारी १ जुलै रोजी मध्यरात्री चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून ७५ हजार रुपयांची रोख रक्कम तर सोने, चांदीचे दागिणे देखील चोरीला गेले आहेत. रविवारी २ जुलै रोजी सकाळी ८ वाजता भुषण श्रीखंडे यांच्या शेजाऱ्यांना कंपाऊंडला कुलूप दिसले मात्र घराचा दरवाजा मात्र तुटलेला दिसून आला. त्यामुळे शेजाऱ्यांनी श्रीखंडे यांचे सासरे संतोष साळवी यांना या घटनेची माहिती दिली. साळवी यांनी घरी जावून पाहणी केली असता, चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर साळवी यांनी जळगाव  तालुका पोलिसांना माहिती दिली. तालुका पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. तसेच डॉग स्कॉडव्दारे तपासणी देखील केली. दरम्यान, तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणी पोलीसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

Protected Content