लोहारा परिसरात माणुसकी समूहातर्फे वृक्षारोपण

 

पाचोरा, प्रतिनिधी  । लोहारा परिसरात आज माणुसकी समूहातर्फे वृक्षारोपण करण्यात आले

कोरोनाने या दोन वर्षात आपल्याला भरपूर शिकवल.तसेच राज्यात व जिल्ह्यात आँक्सिजनच्या तुटवड्यामुळेही भरपूर जणांना आपला जिव गमवावा लागला आहे.झाडांची होणारी कत्तल याचे हे दुष्परिणाम आहेत झाडे हे आँक्सिजन देण्याचे काम करतात आणी झाडांमुळे आपल्याला आँक्सिजन मिळण्यास मदत होते. हा विषय मनी धरुन  वृक्षसंवर्धन सप्ताहात आपले ही योगदान व्हावे या उद्देशाने माणुसकी रुग्णसेवा समूह तर्फे समाजसेवक गजानन क्षीरसागर, राजू नाईक यांच्याकडून लोहारा परीसरात अशोका, चांदणी, मोगरा, गुलाब, निम, पिंपळ, अशा प्रकारचे २५ वृक्ष लाऊन ते जगवण्याचा निर्धार केला आहे. 

 

माणुसकी समूह व सुलक्ष्मी सेवाभावी संस्था वेळोवळी समाज उपयोगी उपक्रम राबवीत असतात. यावेळी सहाय्यक फौजदार उदय कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपनाला  सुरुवात करण्यात आली. माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर, राजू नाईक, सरदार नाईक, धर्मराज नाईक, अशोक चौधरी, अमोल माळी, मोहाडी व लोहारा येथील माणुसकी ग्रुप सदस्य व गावकरी मंडळी यांनी मेहनत घेतली.

 

लोहारा गावातील माणुसकी ग्रुप सदस्य यांनी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांचा उत्साह जबरदस्त होता वृक्षारोपण काळाची गरज असून त्याचे भरपूर फायदे आहेत. भावी पिढीसाठी ही एक शिदोरी आहे ती आपण जपली पाहिजे ,असे सहाय्यक फौजदार उदय कुलकर्णी यांनी सांगितले .

Protected Content