सेनेला प्रशिक्षण देऊन शक्ती वाढवून सज्ज ठेवा ; चीनच्या अध्यक्षांची सैन्याला सूचना

बीजिंग (वृत्तसंस्था) चीनचे सार्वभौमत्व टिकवण्याची तयारी ठेवा. सेनेला प्रशिक्षण देऊन शक्ती वाढवून सज्ज ठेवा, अशा शब्दात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी सेनेला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

 

शी यांनी सैन्यदलाला सांगितले की, सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करा, त्याबद्दल विचार करा आणि युद्धाची सज्जता व प्रशिक्षण वाढविण्यावर भर द्या, सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितींचा त्वरित व प्रभावीपणे सामना करण्याची तयारी ठेवा. त्याचवेळी राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाचे हितांचंही संरक्षण करा. भारत आणि चीन यांच्यात वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) जवळपास 20 दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे. कोरोनामुळे जगभरात चीनविरोधात संताप वाढत चालला आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांसोबत चीनचे संबंध ताणले गेले आहेत. भारताच्या लडाख सीमेवर चीनकडून कुरापत्या सुरु आहेत. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांच्याकडून युद्ध सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content