सुशांत एका बंगाली मुलीमुळे त्रस्त होता ; न्यायालयीन चौकशी करा, कुटुंबाची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) सुशांत एका बंगाली मुलीमुळे त्रस्त होता. काही दिवसांनी वडिलांची भेट होणार होती पण दुर्दैवाने ही बातमी समोर आली. या मृत्यूची न्यायालयीन चौकशीची मागणी सुशांतच्या मामांनी केली आहे.

 

 

मुंबई पोलिसांनी सुशांतच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यात होता. आज घटनेच्या वेळी सुशांतचे काही मित्रही त्याच्या घरी होते. सुशांत काही काळ त्याच्या खोलीत गेला होता. जेव्हा तो जास्त वेळ बाहेर आला नाही नाही. अगदी तो फोन देखील उचलत नव्हता. त्यामुळे मित्रांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांना समोर सुशांतचा मृतदेह पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेनंतर त्याच्या नोकराने पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, सुशांत एका बंगाली मुलीमुळे त्रस्त होता. त्यामुळे सुशांतच्या मामांनी या मृत्यूची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

Protected Content