मुंबई (वृत्तसंस्था) सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आहे. याच प्रकरणी ईडीकडून होणाऱ्या चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात रिया आज हजर झाली आहे.
सुशांत सिंह आत्महत्येनंतर सीबीयाकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली असून ईडीकडूनही रियाची चौकशी आज करण्यात येणार आहे. रिया चक्रवर्ती या चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? यावरुन अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत होत्या. अशातच रिया चक्रवर्तीने चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. ईडीने नोटीस बजावल्यानंतर रियाची चौकशी होणार आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियाने केली होती. मात्र तिची ही विनंती फेटाळून लावण्यात आली. दरम्यान, ईडीने सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिलादेखील आज चौकशीसाठी बोलावले आहे. ८ ऑगस्ट रोजी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याची चौकशी केली जाईल. रियाने पाटणा येथील तिच्यावरील खटला मुंबईत वर्ग करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर कोरोना होण्याच्या भितीमुळे रिया चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याची चर्चा होती. परंतू ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी रिया आज हजर झाली आहे.