मुंबई (वृत्तसंस्था) सुशांतच्या कुटुंबियांना न्याय मिळावे ही आमची इच्छा आहे. पण, तेथे बसून तुम्ही आमच्यावर हल्ले करत असाल सरकारला काम करू देत नसाल तर मग गोंधळ होईल. सुशांतच्या कुटुंबियांची आम्हाला सहानुभूती आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, मी असे म्हटले होते की सुशांतच्या कुटुंबीयांनी धीर धरणे आवश्यक आहे. पण कुणीतरी असे म्हणाले आहे की मी त्याच्या कुटुंबीयांना धमकावत आहे. हे धमकी कशी होऊ शकते? तुम्ही माझ्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ कसा काय लावू शकता? आम्हाला सुशांतच्या कुटुंबीयांइतकीच या प्रकरणाची काळजी आहे. दरम्यान, तत्पूर्वी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना संजय राउत यांनी तपास होत नाही तोपर्यंत सुशांतच्या कुटुंबियांनी शांत राहावे. सुशांतचा मृत्यू मुंबईत झाला आहे. तरीही पाटण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यात बिहारने सीबीआय चौकशीची शिफारस केली आणि केंद्राने लगेच सीबीआय चौकशीला मंजुरी दिली. हे अक्षरशः बेकायदेशीर आहे. तांत्रिकदृष्ट्या हे प्रकरण सीबीआयकडे आहे.