जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सुरभि बहुउद्देशीय महिला मंडळाचा 21वा वर्धापन दिन नुकताच पार पडला त्यानिमित्ताने सुरभी मंडळाची भरीत पार्टी आणि स्नेह मिलन बहिणाबाई उद्यान येथे आज (दि. 31 डिसेंबर 2022) शनिवारी आयोजित करण्यात आले होते.
ह्यावेळी सरप्राईज गेम आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मंडळाच्या सभासदांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला आणि अतिशय आनंदात हा कार्यक्रम पार पडला .ह्यात कविता- आसावरी जोशी, कथाकथन-कथा “पाझर, वैदेही नाखरे”, उखाणा, वैशाली ढेपे, मनोगत-अनिता देशपांडे, चारोळी- संध्या कौल तसेच सरप्राईज गेम मध्ये कुंदा परांजपे, सीमा नाईक, सुनीता मॅडम, रोहिणी कुळकर्णी, सिंधुमती वरणगावकर ह्यांना बक्षिसे मिळाली. गेल्या 21 वर्षात मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमावर तसंच सुरभि मंडळाची वाटचाल ह्यावर प्रश्न उत्तरे असं ह्या गेमचे स्वरूप होते. त्यानंतर फेर धरून गाणी आणि धम्माल करून इंग्रजी वर्षाला निरोप देण्यात आला. ब्राह्मदंडचे संचालक अजय डोहळे ह्यांनी सर्व सभासदांना नविन वर्षाची दिनदर्शिका भेट स्वरूपात वाटल्या. मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कुळकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. त्या नंतर सभासदांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा राव ह्यांनी केले. रेवती शेंदुर्णिकर, विनया भावे, वैदेही नाखरे, सुनिता सातपुते, नीलिमा नाईक, मेघा नाईक, ह्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले, सर्वांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.