सुब्रमण्यम स्वामी यांचा सरकारला घरचा आहेर !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्रीय अर्थसंकल्पानंतर इंधनाचे दर कडाडले असून यावरून भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका करत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेती क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी पेट्रोल-डिझेलवर उपकर घेतला जाणार असल्याची घोषणा केली. पेट्रोलवर प्रति लिटर अडीच रुपये, तर डिझेलवर प्रति लिटर चार रुपये उपकर आकारला जाणार आहे. यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढणार असल्याने सर्वच स्तरातून या दरवाढीला विरोध होताना दिसत आहेत. त्यातच भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला इंधन दरवाढीवरुन घरचा आहेर दिलाय.

इंधन दरवाढीवरुन निशाणा साधताना सुब्रमण्यम स्वामी यांनी श्री रामाच्या भारतामध्ये पेट्रोल ९३ रुपये लिटर आहे. सीता मातेच्या नेपाळमध्ये ५३ रुपये लिटर आहे तर रावणाच्या लंकेत ५१ रुपये लिटर पेट्रोल आहे, असा मजकूर असणारा फोटो शेअर केला आहे.

Protected Content