सुप्रीम कोर्टाची स्थगिती उठवून आरक्षण पूर्ववत करा (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । मराठा समाजाला मिळालेले एस.इ.बी.सी. आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून मिळालेली स्थगिती उठवून पूर्वीप्रमाणे आरक्षणासंदर्भात कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण संदर्भात मराठा आरक्षण समितीने विविध आंदोलन करून पाठपुरावा केला आहे. मराठा समाजाला इतर कोणत्याही जातीचे हक्क अधिकारात हस्तक्षेप न करता आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या आरक्षणाद्वारे त्याची पूर्णतः चौकशी होऊन स्थगिती उठवून पूर्ववत आरक्षण नियमित करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सकल मराठा समाज शिवाजीनगरने दिलेल्या निवेदनावर विजय बांदल, संतोष भिताडे, गणेश गोजर, विश्वास मलांगडे , उत्तम शिंदें निशांत काटकर, नरेंद्र शिंदे, मारुती महांगडे, निशांत पाटील, मोहन जाधव,प्रमोद महांगडे आदींची स्वाक्षरी आहे.

भाग १
https://www.facebook.com/watch/?v=466323310924817

भाग २

https://www.facebook.com/watch/?v=333376137954434

Protected Content