जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील एका भागात राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रीम कॉलनी परिसरात १५ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी असताना कुर्बान शेख (पूर्ण नाव माहित नाही) याने अल्पवयीन मुलीला पोस्ट लावून पळवून नेले. दरम्यान तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही ). अखेर शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कुरबान शेख पूर्ण नाव माहित नाही याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.